हिंदू मुस्लिम ऐक्य साधणारे शिर्डीचे साईबाबा हे एक युगपुरुषच. आयुष्यभर कफनी नेसून त्यांनी समाजाची सेवा केली. त्यांच्या चरित्रात त्यांच्या समाजसेवेचे आणि समाजाला नीतिमूल्यं शिकवल्याचे अनेक दाखले मिळतात. याच साईंनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगाला दिला.श्रद्धा आणि सबुरी म्हणजे नेमकं काय, त्यातून काय साध्य होणार आहे हे जाणून घेऊया.. सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged" मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..