पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti
पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti

पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti

Sutradhar

Overview
Episodes

Details

आजपासून साधारण दोन हजार वर्षांपूर्वी भारताच्या दक्षिणेला महिलारोप्य नावाचं नगर होतं. जिथे अमरशक्ती नावाचा राजा राज्य करत होता. अमरशक्तीला तीन मुलं होते. बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती. राजा अमरशक्ती नीतीशास्त्रात जितका निपुण होता तेवढेच त्याचे पुत्र महामूर्ख होते. लेखन-वाचनात त्यांचं मन अजिबात रमत नसे. आणि याची अमरशक्ती राजाला खूपच चिंता होती. एके दिवशी त्याने हीच चिंता आपल्या समस्त मंत्रीमंडळासमोर मंडळी आणि त्यांच्याकडे या विषयी सल्ला मागितला. राजा आपल्या मंत्र्यांना म्हणाला, "माझे पुत्र अजिबातच लेखन-वाचनात लक्ष देत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना शास्त्रांचं जराही ज्ञान नाहीये. यांना असं पाहिल्यावर मला त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचीही चिंता लागून राहिली आहे. तुम्ही लोक कृपा करून या समस्येवर काही उपाय सांग." सभेत उपस्थित एक मंत्री म्हणाला, "राजा! पहिल्या बारा वर्षांपर्यंत व्याकरण शिकायचं असतं. त्या नंतर मनूच्या धर्मशास्त्राचा, चाणक्यच्या अर्थशास्त्राचा आणि नंतर वात्सायनच्या कामशास्त्राचा अभ्यास केला जातो. त्यानंतर ज्ञान प्राप्ती होते." मंत्र्याचं म्हणणं ऐकून राजा म्हणाला, "मानवाचं जीवन खूपच अनिश्चित आहे आणि अशा प्रकारे सगळी शस्त्र अभ्यासण्यात, वर्ष निघून जातील. हे सारं ज्ञान प्राप्त करण्याचा काही दुसरा उपाय सांगा." तेव्हा सभेत उपस्थित सुमित नावाचा मंत्री म्हणाला, "इथे समस्त शास्त्रांतील विद्वान आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेले विष्णुशर्मा नावाचे आचार्य राहतात. तुम्ही तुमचे पुत्र त्यांच्या ताब्यात द्या. ते अवश्य तुमच्या पुत्रांना कमी कलावधीत समस्त शास्त्रांचं ज्ञान प्रदान करतील."   सुमतीचं हे बोलणं ऐकून राजाने त्वरित विष्णुशर्माला आपल्या सभेत बोलावलं आणि सांगितलं, "आचार्य! तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या या पुत्रांना लवकरात लवकर नीतीशास्त्राचं ज्ञान प्रदान करा. जर तुम्ही असं केलं, तर मी तुम्हाला शंभर गावं पुरस्कार म्हणून भेट देईन." राजाचं बोलणं ऐकून  विष्णुशर्मा म्हणाले, "राजन माझ्यासारख्या ब्राह्मणाला शंभर गावांचा काय लोभ, मला तुमचा पुरस्कार नको. मी तुमच्या पुत्रांना जरूर ज्ञान प्रदान करेन आणि पुढील सहा महिन्यांत त्यांना नीती शास्त्रात निपुण बनवेन. जर मी असं करू शकलो नाही, तर तुम्ही मला जरूर दंडित करू शकता." विष्णुशर्माची ही प्रतिज्ञा ऐकून समस्त मंत्रीगण आणि राजा खूप खुश झाला आणि तिन्ही राजपुत्रांना त्यांच्या स्वाधीन करून निश्चिंत होऊन राज्य कारभारत व्यग्र झाला. विष्णुशर्मा तिन्ही राजकुमारांना आपल्या आश्रमात घेऊन आला आणि पशूपक्षांच्या काहण्यांद्वारे त्यांना शिक्षण देऊ लागला. विष्णुशर्माने या कहाण्यांना पाच भागात विभागलं ते अशा असे, पहिला भाग मित्रभेद : अर्थात मित्रांमधील वाद भांडणे, एकमेकांपसून लांब जाणे, दुसारा भाग मित्रसंप्राप्ती म्हणजे मित्र प्राप्ती आणि त्याचे लाभ, तिसरा भाग  काकोलूकीया म्हणजे कावळा आणि घुबडाच्या कथा. चौथाभाग लब्धप्रणाश म्हणजे जिवावर बेतलं, तर काय करायचं आणि पाचवा भाग अपरीक्षितकारक अर्थात ज्या विषयातली माहिती नसले घाईगडबडीने त्यातपावले उचलू नयेत. याच नैतिक काहाण्यांद्वारे विष्णुशर्माने तिन्ही राजकुमारांना सहा महिन्यातच नीतीशास्त्रात विद्वान बनवलं.  मनोविज्ञान, व्यावहारिक दृष्टीकोण आणि राज्यकारभाराची शिकवण देणार्‍य काहण्यांच्या संकलनाला पंचतंत्र म्हटलं जातं आणि याच कहाण्याच्या माध्यमातून मुलांना रंजक पद्धतीने ज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात. सूत्रधारच्या या पर्वात आम्ही मुलांना विचारात घेत पंचतंत्राच्या या कहाण्या सादर करत आहोत.  https://play.google.com/store/apps/details?id=com.sutradhar

Recent Episodes

साधू आणि उंदीर
DEC 8, 2022
साधू आणि उंदीर
भारताच्या दक्षिणेला स्थित, महिलारोप्य नावाच्या शहराबाहेर भगवान शंकराचा एक मठ होता, जिथे ताम्रचूड नावाचा एक भिक्षू शहरातून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे.त्याचं अर्ध पोट भिक्षेने भरायचं आणि अर्ध अन्न तो  पोटलीमध्ये  बांधून खुंटीला टांगायचा. ती  अर्धी भिक्षा तो त्या मठातील सफाई कर्मचाऱ्यांना पगार म्हणून वाटायचा. अशा प्रकारे त्या मठाची देखभाल चांगली चालली होती. एके दिवशी मठाच्या आसपास राहणारे उंदीर हिरण्यक नावाच्या उंदराला म्हणाले, “आम्ही आमची भूक भागवण्यासाठी इकडे तिकडे भटकतो, आणि स्वादिष्ट अन्न तिथे खुंटीवर टांगलेल्या पोटलीमध्ये बांधलेले असते. प्रयत्न करूनही आम्ही  त्या खुंटी पर्यंत पोहोचू शकत नाही. तू आम्हाला काही मदत का करत नाहीस?" आपल्या साथीदारांचं  म्हणणं ऐकून हिरण्यक त्यांच्यासह मठात पोहोचला. त्याने उंच उडी घेतली. पोटलीमध्ये ठेवलेलं अन्न त्याने स्वतः खाल्लं आणि आपल्या साथीदारांनाही खाऊ घातलं. आता हे चक्र रोज सुरू झालं. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी पगार न मिळाल्याने मठात काम करणं बंद केलं. या सगळ्या प्रकारामुळे  संन्यासी खुप नाराज झाला Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
play-circle
10 MIN
लोभी कोल्हा
DEC 1, 2022
लोभी कोल्हा
शिथिलौ च सुबद्धौ च पततः पततो ना वा। निरीक्षितौ मया भद्रे दश वर्षाणि पक्ष च॥   ज्याच्या नशिबात लिहिलं आहे, त्याला तेच मिळतं, बघा एकट्या बैलाला मारण्याच्या आशेने कोल्ह्याला पंधरा वर्षं कसं भटकावं लागलं.   एका जंगलात तीक्ष्णशृंग नावाचा बैल राहत होता, तो आपल्या शक्तीच्या आहारी गेला होता, आपल्या कळपापासून तो वेगळा झाला होता आणि एकटाच फिरत होता. तो हिरवे गवत खात असे, थंड पाणी पीत असे  आणि आपल्या धारदार शिंगांनी खेळत असे. याच जंगलात एक लोभी कोल्हा सुद्धा आपल्या कोल्हीणीसोबत राहत होता. एकदा नदीकाठी पाणी प्यायला आलेल्या तीक्ष्णशृंगबैलाला पाहून कोल्हीण म्हणाली, हा एकटा बैल किती दिवस जगणार? जा, तू या बैलाचा पाठलाग कर. आता आपल्याला खायला चांगले मांस मिळेल. कोल्हा म्हणाला, " मला इथे बसू दे . इथे  पाणी प्यायला आलेले उंदीर खाऊन आपण दोघेही आपली भूक भागवू. जे मिळू शकत नाही त्यामागं  धावणं  मूर्खपणाचं आहे.” कोल्हीण  म्हणाली, “तू तर मला नशिबाने मिळालेल्या काही गोष्टींवर समाधान मानणारा आळशी वाटतोस . आळस सोडून पूर्ण लक्ष देऊन या बैलाचा पाठलाग केलास  तर नक्की यश मिळेल. तू नाही गेलास तरी मी जाते."   अशा प्रकारे समजावून सांगितल्यावर कोल्हा तयार झाला. कोल्हा बराच काळ  बैलाचा पाठलाग करत होता, पण त्या बैलाची कोणीही आजपर्यंत शिकार करू शकलं नव्हतं . पंधरा वर्ष प्रयत्न केल्यावर कोल्हा आपल्या पत्नीला म्हणाला, "प्रिये ! तुझ्या सांगण्यावरून मी पंधरा वर्षांपासून या बैलाच्या मागे लागलो आहे, त्याला मारण्याची इच्छा आहे, पण हा बैल इतका शक्तिशाली आहे की मला ते शक्य होत नाहीये ." शेवटी, कोल्ह्याचं  म्हणणं मान्य करून  ते दोघेही बैलाचा नाद सोडून माघारी गेले. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
play-circle
4 MIN
"विणकराचे धन"
NOV 24, 2022
"विणकराचे धन"
सोमिलक नावाचा एक विणकर, जो एका गावात राहत होता, तो एक उच्च दर्जाचा कलाकार होता. तो राजांसाठी उत्तम कपडे विणत असे, पण तरीही तो सामान्य विणकरांइतका पैसा कमवू शकला नाही. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे व्यथित होऊन एके दिवशी सोमिलक आपल्या पत्नीला म्हणाले, "प्रिये ! देवाची ही काय लीला आहे की सामान्य विणकरही माझ्यापेक्षा जास्त कमावतो. मला वाटते की कदाचित ही जागा माझ्यासाठी योग्य नाही,  म्हणून मला दुसऱ्या ठिकाणी जाऊन माझे नशीब आजमावायचे आहे.” अर्थस्योपार्जनं कृत्वा नैव भोगं समश्नुते।  अरण्यं महदासाद्य मूढः सोमिलको यथा॥  संपत्ती प्राप्त करूनही काही लोक त्याचा उपभोग घेऊ शकत नाहीत, पहा कशा प्रकारे मूर्ख सोमिलक  भरपूर धन कमवूनही शेवटी गरीबच राहिला.  सोमिलाकची बायको म्हणाली, “तुम्ही असा विचार करणं योग्य नाही. भलेही मेरू पर्वतावर जा किंवा मरुस्थलामध्ये राहायला जा, तुम्ही जिथे वाटेल तिथे जा परंतु एक लक्षात घ्या तुम्ही कमावलेल्या धनाचा तुम्ही योग्य वापर केला नाही तर ते धन निघून जाते. यासाठी मला वाटतं की तुम्ही तुमचं काम इथे राहूनच करावं. विणकर म्हणाला, "प्रिये ! मी तुझ्या मताशी सहमत नाही. कष्ट करून कोणीही आपले नशीब बदलू शकतो. म्हणूनच मी नक्कीच दुसऱ्या देशात जाईन."   असा विचार करून सोमिलक दुसऱ्या शहरात गेला आणि अधिक कार्यक्षमतेने काम करू लागला . काही काळातच त्याने तीनशे सोन्याची नाणी कमावली. मग ती सोन्याची नाणी घेऊन तो आपल्या घराकडे निघाला. वाटेत सूर्यास्त झाल्यावर वन्य प्राण्यांपासून बचावासाठी तो झाडाच्या फांदीवर झोपला. मध्यरात्री त्याने भाग्य आणि पुरुषार्थ नावाच्या दोन व्यक्तींचे बोलणे ऐकले. भाग्य पुरुषार्थाला म्हणाला, जर तुला माहितीये की या विणकाराच्या नशिबात धन नाहीये तर तू त्याला तीनशे मुद्रा का देऊ केल्यास? पुरुषार्थ त्याला म्हणाला, मला त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळवून द्यायचं होतं याउपर तुला सगळंच माहीत आहे. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
play-circle
9 MIN
लोभी गिधाड
NOV 17, 2022
लोभी गिधाड
एकदा एक शिकारी घनदाट जंगलात शिकार करायला गेला. तेवढ्यात त्याची नजर एका काळ्याभोर रानडुकरावर पडली. शिकाऱ्याने आपल्या बाणाने त्याच्यावर हल्ला केला. जखमी डुक्करही वळले आणि शिकाऱ्याच्या छातीमध्ये त्याने आपली शिंगे घुसवली. अशा रीतीने रानडुकराचा बाण लागल्यामुळे मृत्यू झाला आणि शिकारीही रानडुकराच्या शिंगाच्या वाराने मरण पावला. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेलं एक गिधाड तिथे आलं आणि दोघांनाही मेलेले पाहून त्यानं स्वतः च्या नशिबाचं कौतुक केलं आणि म्हणालं , आज देव माझ्यावर प्रसन्न झाला आहे असं दिसतंय म्हणून तर न मागता न भटकंती करता इतकं अन्न मला मिळालं.   आणि मग गिधाडाने विचार केला,आता मला हे अन्न नीट पुरवून पुरवून खाल्लं पाहिजे ज्यामुळे माझी गाडी यावरच जास्त काळ चालेल आणि मला अन्नाच्या शोधात जास्त भटकावं लागणार नाही तेव्हा मी या शिकार्‍याच्या धनुष्याला जोडलेली हि दोरी खाऊनच माझी भूक भागवतो असा विचार करून गिधाड धनुष्याची दोरी तोंडात घालून खाणार एवढ्यात ताणल्यामुळे ती दोरी तुटली. आणि धनुष्याचा वरचा भाग गिधाडाच्या छातीत घुसला त्यासरशी तो जोरात ओरडून ,खाली पडला आणि मेला Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
play-circle
4 MIN
ब्राह्मण पत्नी आणि काळे तिळ
NOV 10, 2022
ब्राह्मण पत्नी आणि काळे तिळ
      एका नगरात एक ब्राह्मण राहत होता. एका पहाटे ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला , आज दक्षिणायन संक्रांत आहे , आज दान केल्याने चांगले फळ मिळते मी याच आशेने जात आहे. आज तू एखाद्या ब्राह्मणाला भोजन दे. हे ऐकून ब्राह्मण पत्नी म्हणाली , तुम्हाला हे सगळं सांगताना लाज नाही का वाटत? या गरिबाच्या घरात आहेच काय ज्यातून कुणाला भोजन देऊ शकतो ? ना आपल्याकडे वापरायला चांगले कपडे आहेत , ना सोनं- चांदी . आपण कोणाला काय दान देणार ?   पत्नीचं हे कठोर बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला, "तुझं हे असं बोलणं योग्य नाही. धन तर आजपर्यंत कोणालाच नाही मिळालं, आपल्याकडे जे काही आहे त्यातंलच थोडंफार कोण्या गरजूला देणं हेच खरं दान असतं.   पतीच्या अश्या समजावण्याने पत्नी म्हणाली, ठीक आहे . घरात थोडे तीळ ठेवले आहेत, मी त्यांची सालं काढते आणि त्यातूनच काही बनवून त्या ब्राह्मणाला भोजन देईन.   पत्नीकडून आश्वासन मिळाल्यावर ब्राह्मण दुसर्‍या गावी दान घेण्यासाठी निघून गेला. इकडे ब्राह्मण पत्नी ने तीळ कुटले, धुतले आणि सुकवण्यासाठी उन्हात ठेऊन दिले. तेव्हाच एका कुत्र्याने सुकत घातलेल्या तिळांवर लघवी केली. आता ब्राह्मण पत्नी विचार करू लागली, 'हे तर दुष्काळात तेरावा महिना असं झालं. आता मी कोणालातरी हे धुतलेले तीळ देऊन त्या बदल्यात न धुतलेले तीळ घेऊन येते.'   Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
play-circle
5 MIN