शिथिलौ च सुबद्धौ च पततः पततो ना वा।
निरीक्षितौ मया भद्रे दश वर्षाणि पक्ष च॥
ज्याच्या नशिबात लिहिलं आहे, त्याला तेच मिळतं, बघा एकट्या बैलाला मारण्याच्या आशेने कोल्ह्याला पंधरा वर्षं कसं भटकावं लागलं.
एका जंगलात तीक्ष्णशृंग नावाचा बैल राहत होता, तो आपल्या शक्तीच्या आहारी गेला होता, आपल्या कळपापासून तो वेगळा झाला होता आणि एकटाच फिरत होता. तो हिरवे गवत खात असे, थंड पाणी पीत असे आणि आपल्या धारदार शिंगांनी खेळत असे. याच जंगलात एक लोभी कोल्हा सुद्धा आपल्या कोल्हीणीसोबत राहत होता. एकदा नदीकाठी पाणी प्यायला आलेल्या तीक्ष्णशृंगबैलाला पाहून कोल्हीण म्हणाली, हा एकटा बैल किती दिवस जगणार? जा, तू या बैलाचा पाठलाग कर. आता आपल्याला खायला चांगले मांस मिळेल.
कोल्हा म्हणाला, " मला इथे बसू दे . इथे पाणी प्यायला आलेले उंदीर खाऊन आपण दोघेही आपली भूक भागवू. जे मिळू शकत नाही त्यामागं धावणं मूर्खपणाचं आहे.”
कोल्हीण म्हणाली, “तू तर मला नशिबाने मिळालेल्या काही गोष्टींवर समाधान मानणारा आळशी वाटतोस . आळस सोडून पूर्ण लक्ष देऊन या बैलाचा पाठलाग केलास तर नक्की यश मिळेल. तू नाही गेलास तरी मी जाते."
अशा प्रकारे समजावून सांगितल्यावर कोल्हा तयार झाला. कोल्हा बराच काळ बैलाचा पाठलाग करत होता, पण त्या बैलाची कोणीही आजपर्यंत शिकार करू शकलं नव्हतं .
पंधरा वर्ष प्रयत्न केल्यावर कोल्हा आपल्या पत्नीला म्हणाला, "प्रिये ! तुझ्या सांगण्यावरून मी पंधरा वर्षांपासून या बैलाच्या मागे लागलो आहे, त्याला मारण्याची इच्छा आहे, पण हा बैल इतका शक्तिशाली आहे की मला ते शक्य होत नाहीये ."
शेवटी, कोल्ह्याचं म्हणणं मान्य करून ते दोघेही बैलाचा नाद सोडून माघारी गेले.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices